इंद्रायणी तीर पावन सुंदर माझे हे माहेर आळंदीत ॥धृ॥१॥
रात्री माऊली समाधी भोगीत । पाजी गीतामृत आम्हालागी ॥२॥
निवृत्ती सोपाना मुक्ताई सुन्दरा । सोडी प्रेमधारा आम्हावरी ॥३॥
टाळ मृदुंगाचा नामाचा गजर । तेथे मी हजर हरिदिनी ॥४॥
वारीचा सोहळा माऊली बोलते । लक्ष्मी बोलते अभंगात ॥५॥