संसारी मी केला तुळशीचा मळा । करडा सांवळा पांडुरंग करडा सावळा ॥धृ॥
कृपा वापीवरी चालवितो मोट । खळाळती पाट । वैराग्याचे ।
खळाळती पाट, बैल होवोनिया वेद राबताती । निंदणी करिती । श्रृती स्मृती । निंदणी करितीं ॥१॥
बारमाही येतो पिकाचा सुकाळ येतो कळिकाळ । आदराने । येतो कळिकाळ ॥२॥
डौलात डुलती ॥ सावळ्या मंजिरी । वासना अंतरी । फळाची वासना अंतरी ॥३॥
जन्म मरणाची मज नाही भिती । जिंको माझी शेती ॥४॥