मानस कन्या कण्वमुनींची बसुनी एकांती, गुंफिते माळ बकुल फुलांची ॥धृ॥
शारद नयनी उमलत होता अनुरागाचा रम्य निलीमा, अरुण, कपोली गोडी लाली य फुलवित लाज तियेची ॥१॥
यौवन सौरभ पुसतो तिजला कोण यायचा सखे पाहुणा, नावाविण ही घेत उखाणा प्रीत तिच्या हृदयाची ॥२॥
आठवणीची करिता मृगया, हसते खुदुखुदु मनी आतुरता, सखया येता मंगळ घटिका आली स्वयंवराची ॥३॥