येई गा तु मायबापा पंढरीच्या राया । तुजविण क्षिण वाटे क्षिण झाली काया । यातीहीन मती हीन यातीहीन मतीहीन कर्महीन माझे । सर्व लज्जा सोडून बापा शरण आलो तुज । दिनानाथ दिन बंधू नाव तुम्हा साजे । पतीत पावन नाम ऐसी ब्रिदावली गाजे । विटेवरी नीट उभा कटेवरी कर । तुका म्हणे हेची आम्हा ध्यान निरंतर ।