अर्जुन पुसतो सुभद्रेला प्रिया मज सुंदरी सांग तू मजला डोहाळे काय तुझे हे मम प्रिये यदुतनये ॥१॥
दुसरे मासीचे प्रकार सारे खावे वाटते चिंचा बोरे पाडाचे आंबे पिवळे ॥२॥
प्रथम गरोदर देवकी बाळी अंगी घाला चोर चोळी भोजनाला पुरणपोळी पंक्तीला सजून आले ॥३॥
चौथा महिना सुभद्रेला नाग केवडे वेणीत घाला मांडीले वरी भोजनाला लाजूनी ती सुंदरी पाहे ॥४॥
पाचवा महिना सुभद्रासी हिरवी बांगडी दिसते खासी हिरवा चुडा शालू नेसायासी नाव घेती आता सखये ॥५॥
सहावे मासी तुज काय होतसे प्रिये सुंदरी पत्र लिहीतसे आमळ थोडी घेरी येते स्त्रियाना अनुभव आहे मम ॥६॥
सातवे मासी ह्या ही परी केल्या मौतिक खिरी पिवळे पातळ भरजरी वेणीला गजरा घाला ॥७॥
आठ महिन्याची करा तयारी आडगुळाची गंमत भारी कृष्ण सुभद्रेसी विचारुनी चूचकारुनी अर्जुन पाहे मम ॥८॥
नऊ मास नऊ दिन जाहले अभिमन्यू ते बाळ जन्मले चंद्र, सूर्य लाजूनी गेले जन्माचे सार्थक झाले ॥९॥