अग हा नंदाचा कान्हा पाण्याला जाऊच देईना ॥धृ॥
शामसुंदरा उभा वाटेवरि, मयुर पिसे शिरी मुरली वाजवी तनानाऽऽ ॥१॥
घागर घेऊनी शिरी येत होते घरी येत होते घरी । चेंडू मारि वरि धड घागर घरि येऊ देईना ॥२॥
शिरी भरला घडा नको मारू खडा नको मारू खडा । सख्या जाईल तडा किती सांगू तुला मन मोहना ॥३॥
यासी दटविता हासे खदाखदा हासे खदाखदा । राग नये कदा । हा कोण्याच्या बापाला भिईना ॥४॥
याच्या पाहता मुखा हरल्या तहान भुका हरल्या तहान भुका । संसार झाला फिका । म्हणूनी लक्ष्मी लागते चरणा ॥५॥