देवा तुझे रुप किती किती गोड गोड । लाविलेस वेड माझ्या जीवा ॥
देहभान सारे जाई विरोनिया ।जीवावीण काया कैसी राहे ॥१॥
काय केली देवा तुवा जादुगरी । झालो मी पुजारी सर्वकाळ ॥२॥
कोणी काही सांगो नाही त्याची खंत । करीन मी अंत तुझीया द्वारी ॥३॥
रोम रोमी वेड तुझीया छंदाने । बोल आनंदाने देवदास ॥४॥