ब्रह्म विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले ॥धृ॥
माय उभी ही गाय होऊनी पुढे वासरु पाहे वळूनी ।
कृतज्ञतेचे श्वान बिचारे पायावर झुकले ॥१॥
चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे घुमटामधून हृदय पाखरुं स्वानंदे फिरले ।
तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया, तुमच्या हाती माझ्या भवती औदूबंर बसले ।
मला हे दत्तगुरु दिसले । ब्रह्मा विष्णू महेश्वर सामोरी बसले ॥२॥