गरजत गेलो रे मुखाने हरी हरी । तुझी विठूराया रे पाहिली पंढरी ॥धृ॥
गजर चाले हरीनामाचा । अफाट मेळा भक्त जनांचा । भाविकांचे स्नान चाले चाले भीमातीरी ॥१॥
जनाबाईचे पाहुनी जाते सत्य युगाचे दर्शन होते । धन्य नामदेवा तुझी पहिलीच पायरी ॥२॥
पुंडलीकाने विटही झोकीली । विठू माऊलीने तिथे बरी रोकली । हटला नाही युगे अठ्ठाविस झाली तरी ॥३॥
पंढरी पाहूनी झालो मी धन्य । तुझ्याच चरणी देवा झालो मी लीन । सावळीच मूर्ती तुझी बसली अंतरी ॥४॥