आज गोकुळांत रंग खेळती हरी । राधिके जरा जपून जा तुझ्या घरी । तोचि चित्त चोर वाट रोखीतो । हात ओढूनी खुशाल रंग टाकितो । रंगवूनी रंग गुलाल फांसतो । सांगते अजुन ही तुला परोपरी राधिके ॥१॥
सांग शाम सुंदरास काय जाहले रंग टाकिल्याविण्या कुणा न सोडिले । ज्यास त्यास रंग रंग रंग लाविले । एकटीच वाचशील काय तू परी ॥२॥
त्याविधे अनंग रगरास रंगला । गोप गोपिका सवे मुकुंददंगला । तो पहा मृदुंग मंदिरात वाजला । हाच वाजवी फिरुनी तीच बांसरी ॥३॥