चल उठ रे मुकुंदा झाली पहाट झाली, बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली ॥धृ॥
मंदावला कधी गगनांत शुक्रतारा अन् चोर पावलांनी आला पहाटवारा ।
गलावरी उषेच्या हळूंच लाली, घे आवरुन आता स्वप्नांतला पिसारा ॥१॥
बेचैन गोकुळाने केला तुझा पुकारा, तव गीत गात सारी ही पांखरे उडाली ।
तुज दूर हांक मारी कालिंदीचा किनारा, कुंजातल्या फुलांनी केला तुझा इशारा ।
तुज शोधण्यास वेडी राधा सुद्धां निघाली ॥२॥