आज बाई आनंदी आनंद झाला नंदाच्या घरी आज गोपाळ काला, रिमझिम रिमझिम पाऊस आला ।
नटली सारी सृष्टी बाला बहर आला पारिजातका ॥१॥
नेसा ग तुम्ही पैठणी शेला जरी काचोळी अंगात घाला, गोप्या भाळी कोर ही लावा ॥२॥
गळ्यात घाला पाचूच्या माळा कर्ण भूषणे कुंडल घाला, गोप्या हातामध्ये बिलवर घाला नंदाच्या ॥३॥
गोविंद आला गोपाळ आला रूणझूण पायी वाजे वाळा , दह्यादुधाने देव नाहला नंदाच्या घरी आज गोपाळ काला ॥४॥