कृष्णा तुझी मुरली ती मी पाहिली आज रे । यमुनेच्या पाण्या जातां दृष्टी पडली सहज, विसरले देहभान वासनेचे बीज रे । जाते शुद्ध पथ कान्हा वाट माझी सोड रे जाऊ दे रे जाऊ दे रे कमल नयना कमल नयना कृष्णा कमल नयना ॥१॥
घरी सासु सासर्याचा जाच मला भारी सासू मोठी भांडखोर । नणंद न पाहे बरी । पतीलाही राग येतो । जीव माझा जाईना ॥२॥
पतिव्रता नेम माझा ढळेल हा सारा, तुझ्या पायी संसारी माझा झाला पाठमोरा, एका जनार्दनी माझ्या चुकल्या येरझारा ॥३॥