मनी आनंद झाला, तुझे दर्शन घेता, प्रभु सोमनाथा प्रभु सोमनाथा ॥धृ॥
तुझे दर्शन घेता दु:खहिन होते, तुझे रुप आठविता देहभान होते, तुझे नाम सार्या जगात ही होते ॥१॥
तुझे दर्शनाला भाविक जमले, आनंदाला त्यांच्या सीमा ही नसते, तुझे वेड त्यांना लागले असता ॥२॥
आशीर्वाद देवा असु दे पाठीसी, दीनानाथा जागा दे पायाशी, तुझ्या चरणी मी ठेविला माथा ॥
प्रभु सोमनाथा प्रभु सोमनाथा ॥३॥
N/A