नीज माझ्या नंदलाल नंदलाल रे । शांत हे आभाळ सारे शांत सारे शांत वारे या झर्याचा सूर आता मंद झाला मंद झाला रे ॥१॥
झोपल्या गोठ्यात गाई साद वा पडसाद नाही, पाखरांचा गलबला ही बंद झाला बंद झाला रे ॥२॥
सावळ्याची तीट गाली चांदण्याचा नीज आली रातराणीच्या फुलांचा गंध आला गंध आला रे !
नीज रे आनंदकंदा नीज रे माझ्या मुकुंदा आवरी ह्या घागर्यांच्या छंदलाला छंदलाला रे ॥३॥