क्रूरा अक्रूरा नकोस नेऊ आनंदाचा ठेवा, नेऊ नको माधवा ॥धृ॥
खेळगडी तो गोपाळाचा गिरीधारी रे भक्तजनांचा, नारी गोकुळकान्हा आमुचा सर्व सुखाचा अमोल ठेवा ॥१॥
कुंजवनी रे रास रंगली ताला वरती टिपरी घुमली । धुंद राज रे स्वप्नी उरली ऐकू दे मज मंजूळ पावा ॥२॥
नकोस नेऊ बाळ मुकुंदा वेडी होईल गौळण राधा । तुला विनविती नंद यशोदा अक्रूरा नेऊ नको माधवा ॥३॥