टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची ॥धृ॥
पंढरीची हाट कौलाची पेठ मिळाले चतुष्ठ वारकरी वारकरी ॥१॥
पताकांचे भार मिळाले अपार, होतो जयजयकार भिमातीरी भिमातीरी ॥२॥
हरीनाम गर्जता नाही भय चिंता, ऐसे बोले गिता भागवत भागवत ॥३॥
खटनट यावे शुद्ध होवोनीया जावे, दवंडी पिटी द्यावी दवंटी पिटी द्यावी चोखामेळा चोखामेळा ॥४॥