पाहियला मी अत्रीनंदन ॥धृ॥
दत्त दिगंबर तो करुणाकर जान्हवीचे तीरावर लावण्याचे प्रगटे ज्योत ।
सन्मुख माझ्या ती त्रयमुर्ती । घडले मजला अनुपम दर्शन ॥१॥
शंख चक्रधर तो कमलाकर । जगत पिता तो ब्रह्म शुभंकर । मनी पाहिला स्वरुप संगम ॥२॥
त्या रुपाच्या दर्शन मागे । पावन झाली माझी गात्रे । जोडूनी कर मस्तक नमवून त्या अवधूता केले वंदन ॥३॥