नाम तुझे ऐकोनीया आलो साईनाथ । बैसोनिया दारी तुझ्या गातो मी संगीत ॥धृ॥
गीत तुझे गाता भान हरवुनी गेले । दिव्य दर्शनाने तुझीया प्राण धन्य झाले ।
ऐकलेस माझे साई अर्थंहिन गीत ॥१॥
थोर तुझा महिमा साई कळेना जगास । वास तुझा जगती असुनी ना कळे कुणास ।
बुद्धीहिन गातो तुझे प्रभू साई गीत ॥२॥
स्वर संगिताच्या रुपे, योग तुझा यावा । तुझ्या दर्शनाचा मजला लाभ जगी व्हावा हीच
आशा शेवटची मी धरुनी उरात ॥ आलो साईनाथ नाम तुझे ऐकोनीया आलो साईनाथ ॥३॥
N/A