नकोरे कृष्णा रंग फेकू चूनडी भिजते । मध्य रात्री चांदण्यात थंडी वाजते ॥धृ॥
राधीकेने चोळी शिवली जरी बुट्याची । श्रीकृष्णाने झारि भरली पाण्याची ।
राधा म्हणॆ कृष्णा तुला थट्टा वाटते ॥१॥
केतकीच्या वनामध्ये नाग डोलतो । आंब्याच्या वृक्षावर राघू बोलतो ।
नभातील चंद्रिका ही तुजसी हासते ॥२॥
वायू वाहे मंद मंद दाही दिशा होती धूंद । पोर्णिमेच्या चांदण्यात सृष्टी नाहते ॥३॥
चला जाऊ यमूने कडे रूप आपले पाहू गडे । आनंदी यमुनाजल स्थिर राहते ।
कृष्ण रूपी गोपी सर्व द्वैत भासते ॥४॥