मज भेटुनी जा हो दत्त सख्या अवधुता ॥धृ॥
का तुम्ही कमंडलू विसरुनी आला ईथे । प्रिय स्वान आज ते तुम्हा सवे का नसे ।
काखेसी झोळी ती विसरुनी गेला कुठे । परी तुम्हासी पुरते ओळखिले आता ॥१॥
किती व्याकुळतेने तुम्हास मी आळविले । हृदयीचे भावही व्यथीतपणे कळवीले ।
इंद्रियास दमवूनी चित्तासी वळविले । का उगाच असली सत्वपरिक्षा घेता ॥२॥
किती सुयोग सुंदर भेटीचा मज दिला । ना वियोग भेटीचा तुमचा परी घडावा मजला ।
सर्व स्वभाव मी चरणी तव वाहिला । मन रंगूनी गेले गुरुराया हे आता ॥३॥
N/A