मोतीयाचे पाणी रांजण भरीला पिवूनिया झाला ज्ञानदेव ॥धृ॥
अभ्राची सावली घेऊनीया हाती निघे तो एकांती निवृत्तीनाथ ॥१॥
पुष्पाचा परिमल वेगळा काढीला हार तो ल्याईला सोपानदेव ॥२॥
हिर्याच्या घुगर्या जेवण जेवली जेवोनिया घाली मुक्ताबाई ॥३॥
इतुक्याचे वर्म आले असे हात चागंदेव स्वत: वर्णीतसे ॥४॥