राम दर्शनासी चला लाभ हा बरा ॥धृ॥
रामनवमी रामजन्म नक्षत्र पुर्नवसू, सूर्य माध्यान्यासी देवा जन्म जाहला ॥१॥
दशरथासी दाशरथी पुत्र जाहला, त्रीभुवनात जय जय उदय जाहला ॥२॥
अबरी शबरी बदरी फळे पदरी बांधिले, भावेबळे भुकेलासी भक्षू लागले ॥३॥
समुद्र मंथुनी शंकरासी विष पाजिले, रामनाम मुखी घेता अमृत जाहले ॥४॥
बहु कोटी अन्याय क्षमा करी मला, रामदास रामदास दासांतरी ॥५॥