अबीर गुलाल उधळू या रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥ शिवू कसा उंबरठ्याला आम्ही जाती हीन, पाहू कसे रुप डोळा त्यात आम्ही दर्शन, उभे पायरीशी दंग ऐकता अभंग ॥१॥
वाळवंटी जाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्यात अंग अंग न्हाऊ अंग अंग न्हाऊ, विठोबाचे नाव घेता विठोबाचे नाव घेता चोखा होई दंग, नाचे माझा सखा पांडुरंग ॥२॥