चालविशी आज वाटे मला आळंदीची वाट, दिंड्या आणि पताकांचा तिथे आगळाच थाट ।
वारकरी चालतात पदचिन्हे होती फुले, नाम आणि घोषांतून ओघळती स्वर फुले ॥१॥
वारकरी हृदयात भक्ती अमृताचे घडे, यांच्यामुळे वाटे अमृताचे स्नान घडे ॥२॥
अमृतात न्हावूनीया आळंदीला जाते वाट , प्राणज्योती तेवल्याने तिथे सदाचे पहाट ॥३॥
अलगद मिसळते ज्ञानोबाच्या अंगणात, चिरंजीव होते तेथे कैवल्याच्या प्रांगणात ॥४॥