पाऊले चालावी पंढरीची वाट । सुखी संसाराची सोडूनिया गांठ ॥
गांजुनिया भारी दु:ख दारिद्राने करिता रिकामे भाकरीचे ताट ॥१॥
आप्त इष्ट सारे सगे सोयरे हे पाहूनी हे सारे फिरविती पाठ ॥२॥
घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा अठरा दारिद्रयाचा व्हावा नायनाट ॥३॥
मन शांत होता पुन्हा लागे ओढा रसावाणी गोड संसाराचा थाट ॥४॥