Dictionaries | References

मंत्र

   
Script: Devanagari

मंत्र     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  वे शब्द या वाक्य जिनका जप इष्ट-सिद्धि या किसी देवता की प्रसन्नता के लिए किया जाता है   Ex. पंडितजी महामृत्युंज्य मंत्र का जाप कर रहे हैं ।
HYPONYMY:
बीज मंत्र गुरुमंत्र अजपा णणोकार-मंत्र तंत्र स्त्री-मंत्र अष्टाक्षरी पंचाक्षरी गारुड़ मंत्र तारक मंत्र वाहेगुरु पद्मनाभ साबर कवच विषहर
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मन्त्र स्तुति मंत्र स्तुति मन्त्र ऋचा रिचा मंतर मन्तर अर्क
Wordnet:
asmমন্ত্র
bdमोन्थोर
benমন্ত্র
gujમંત્ર
kanಮಂತ್ರ
kasمَنٛترٕ
kokमंत्र
malമന്ത്രം
marमंत्र
mniꯃꯟꯇꯔ꯭
oriମନ୍ତ୍ର
panਮੰਤਰ
sanमन्त्र
tamமந்திரம்
telమంత్రం
urdدعا , وظیفہ
See : वेदमंत्र

मंत्र     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जाचो जप इश्ट-सिद्धी वा खंयच्याय देवाक प्रसन्न करपा खातीर करतात असलीं उतरां वा वाक्य   Ex. भटमाम म्हामृत्युंजय मंत्राचो जाप करता
HYPONYMY:
बिजमंत्र गुरुमंत्र णणोकार मंत्र स्त्रीमंत्र अश्टाक्षरी पंचाक्षरी गारुड मंत्र तारक मंत्र वाहेगुरु
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
स्तुती मंत्र
Wordnet:
asmমন্ত্র
bdमोन्थोर
benমন্ত্র
gujમંત્ર
hinमंत्र
kanಮಂತ್ರ
kasمَنٛترٕ
malമന്ത്രം
marमंत्र
mniꯃꯟꯇꯔ꯭
oriମନ୍ତ୍ର
panਮੰਤਰ
sanमन्त्र
tamமந்திரம்
telమంత్రం
urdدعا , وظیفہ

मंत्र     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
2 A formula sacred to a deity. 3 Secret consultation; private advice or counsel. v सांग, दे. 4 A division of the Vedas. मंत्र बोधास-गुणास-प्रत्ययास-प्रतीतीस-कळूं-येणें To be felt; to take effect; to tell--a mantra.

मंत्र     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A charm, an incantation. Private advice.

मंत्र     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कार्यसिद्धीसाठी किंवा देवतास्तुतीपर म्हटलेले पवित्र वचन   Ex. ह्या मंत्राचा दिवसातून दोन वेळा जप करावा.
HYPONYMY:
अष्टाक्षरी पंचाक्षरी भूतबाधा उतरवण्याचा मंत्र गुरुमंत्र वाहेगुरु साबर पद्मनाभ णणोकार मंत्र तारक मंत्र
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmমন্ত্র
bdमोन्थोर
benমন্ত্র
gujમંત્ર
hinमंत्र
kanಮಂತ್ರ
kasمَنٛترٕ
kokमंत्र
malമന്ത്രം
mniꯃꯟꯇꯔ꯭
oriମନ୍ତ୍ର
panਮੰਤਰ
sanमन्त्र
tamமந்திரம்
telమంత్రం
urdدعا , وظیفہ

मंत्र     

 पु. 
 पु. १ गुरूपदेश . २ चहाडी . ( सं . मन् - मंत्र )
गूढशक्तियुक्त वाक्य किंवा अक्षरें . ( क्रि० घालणें ; मारणें ; टाकणें ; फुंकणें ) मंत्राचा उपयोग मारण , मोहन , वशीकरण , स्तंभन , उच्चाटन , आकर्षण ह्याकरितां करतात . जे शस्त्रविद्यापारंगत । मंत्रावतार मूर्त । - ज्ञा १ . १०९ .
देवतास्तुतिपर पवित्र वचन . उदा० ओं विष्णवे नमः
वेदभागविशेष ; वेदसंहिता .
मसलत ; गुप्त सल्ला , उपदेश ; विचार . ( क्रि० सांगणें ; देणें ). धर्म म्हणे सिद्धि भजे यन्मंत्रा जेविं वासवा रंभा । - मोसभा १ . ५३ .
युक्ति ; क्लृप्ति . रसु होआवा अतिमात्रु । ह घेतासि कविमंत्रु । - ज्ञा १३ . ६३५ .
गुप्त गोष्ट ; गुह्य . झांकुनि मंत्र पृथेनें अति दुःसह दुःख मज दिल्हें बा हें । - मोशांति १ . ८ . [ सं . ]
०बोधास   गुणास प्रत्ययास प्रती तीस कळूं येणें - मंत्र परिणामकारक होणें , अनुभवास येणें . मंत्रणें - क्रि . ( विरु . ) मंतरणें पहा .
०अक्षता   , ता - स्त्री . अव .
मंत्राक्षत   , ता - स्त्री . अव .
मंत्रानें संस्कारलेले तांदूळ .
( ल . ) आशीर्वाद . त्यास व्यासवाल्मिकादि देति मंत्र अक्षता । - मध्व १९ .
( वि ल . ) शिव्यांचा भडिमार . ( क्रि० देणें ; मारणें )
०कौटाल  न. चेटुकविद्या सभामोहन भुररीं चेटकें । साबर मंत्रकौटालें अनेकें । - दा ५ . २ . २ .
०चळ  पु. 
मंत्रप्रयोगांत चूक होऊन लागणारें वेड . मंत्रचळ नाना खेद । नामनिष्ठें नासती । - दा ४ . ३ . १२ .
( ल . ) वेड लागल्यासारखी , बावचळल्यासारखी होणारी स्थिति . ( क्रि० लागणें )
०चळ्या वि.  
मंत्रप्रयोगांत चूक झाल्यामुळें ज्यास वेड लागलें आहे असा .
लहरी ; बेफाम .
भ्रमिष्ट ; बावचळलेला ; तीच तीच गोष्ट पुन्हां पुन्हां करणारा .
०जागर  पु. अनेक ब्राह्मणांनीं एकमेकासमोर बसून एका पक्षानें एक वाक्य म्हटल्यावर त्या पुढील वाक्य दुसर्‍या पक्षानें म्हणावें असें वेदमंत्र म्हणणें ; वेदघोष करणें .
०तंत्र  पु. अव .
जादू - टोणे ; तोडगे ; जपजाप्य ; छांछूं इ० .
युक्त्या प्रयुक्त्या ; डावपेंच . ( क्रि० लटपटणें ; डगमगणें ; डळमळणें ; कोसळणें ; ढासळणें ; हरणें ).
०पुष्प   पु देवाची संध्याकाळची आरती वगैरे झाल्यावर विशिष्ट वेदमंत्र मोठमोठ्यानें म्हणून देवास फुलें वगैरे वाहणें .
०पुष्पांजलि  स्त्री. 
पूजेनंतर ओंजळींत फुलें घेऊन समंत्रक देवास वाहणें ; मंत्रपुष्प .
( ल . ) शिव्यांचा वर्षाव , लाखोली , भडिमार . ( क्रि० करणें ; वाहणें ; अर्पिणें ).
०प्रयोग  पु. 
मंत्राचा प्रत्यक्ष अनुभव पाहणें .
जादूटोणा करणें ; मंत्र घालणें .
०मुख  पु. आपल्या उपयोगापुरतेच ज्यास मंत्र येतात असा ब्राह्मण .
०वादी वि.  मंत्र व त्यांचा उपयोग जाणणारा ; मंत्री ; मांत्रिक .
०विद्या  स्त्री. 
वेदविद्या . मंत्रविद्येसि माहेर । ब्राह्मण जे । - ज्ञा ९ . ४७५ .
जादूटोणा करण्याची कला .
०शक्ति  स्त्री. 
युद्धाच्या तीन शक्तींपैकीं दुसरी बाकीच्या दोन - प्रभुशक्ति व उत्साहशक्ति .
मंत्राचें सामर्थ्य , प्रभाव .
०शास्त्र  न. विवक्षित देवतेपुढें कोणते मंत्र म्हणावयाचे हें शिकविणारें शास्त्र ; मंत्र विद्या .
०षडक्षरी  स्त्री. रामकृष्णहरी हीं अक्षरें . होऊनी सावध उघडीले नेत्र । आठवला मंत्र षडक्षरी । - ब ७७ .
०साधन  न. मंत्रशास्त्रांत सांगितलेले विधि व नियम पाळून मंत्राचा उपयोग करण्याची शक्ति मिळविणें .
०सिद्धि  स्त्री. मानवी सामर्थ्याच्या आटोक्याबाहेर असलेल्या आठ शक्तींपैकीं एक .
०स्नान  न. प्रत्यक्ष स्नान न करतां कांहीं मंत्र म्हणून जो स्नानाचा गौण प्रकार म्हणून विधि करतात तो .
०ज्ञ वि.  मंत्र जाणणारा ; मांत्रिक . देखा मंत्रज्ञु बरळु जाय । - ज्ञा १ . १९० . मंत्राग्नि पु . उत्तरक्रियेचे मंत्र म्हणून प्रेताचें केलेलें दहन ; सशास्त्र दहन . याच्या उलट भडाग्नि . [ मंत्र + अग्नि ] मंत्रित वि . मंतरलेलें . मंत्री पु .
प्रधान ; अमात्य ; राजाचा सल्लागार .
( सामा . ) सल्ला देणारा ; उपदेश करणारा .
राजाच्या अष्टप्रधानांपैकीं एक ; न्यायाधीश .
मंत्र जाणणारा व त्याचा उपयोग करणारा ; मांत्रिक . मंत्रोपचार - पु . मंत्रप्रयोगाचे विशिष्ट विधि , नियम . [ मंत्र + उपचार ] मंत्रोपदेश - पु .
मंत्र देणें ( गुरुनें शिष्यास ). मातेच्या दर्जाला जेव्हां चढावें तेव्हां मंत्रोपदेश देणार्‍या गुरुची पायरी बायकांना प्राप्त होते . - मेनका ६८ .
सल्लामसलत ; उपदेश . [ मंत्र + उपदेश ] मंत्रोपासना - स्त्री . मंत्र साध्य करुन घेण्याचे नियम पाळणें . ( क्रि० देणें ). [ मंत्र + उपासना ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP