Dictionaries | References

षट् ‍

   { षट् }
Script: Devanagari
See also:  षड् ‍ , षण् ‍ , षष् ‍

षट् ‍     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : छह, छह

षट् ‍     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ṣaṭ S Six. As षष् is the word, षट् & षड् are used only in comp. as षटकोण, षटप्रकार, षडस्र, षडगुणित &c.

षट् ‍     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Six

षट् ‍     

वि.  सहा संख्या ; समासांतहि उपयोग करतात [ सं . षट् ‍ ] ( पुढील सामाशब्द षट् ‍ या पदाशीं जोडून झालेले आहेत ).
०क  न. सहांचा समुदाय .
०कर्ण वि.  सहा कानांचा .
०कर्णी   क्रिवि . तीन इसमांच्या कानीं गेलेली म्हणजे चार कानीं गेलेला , गुप्त विचार उघड होत नाहीं , तीन इसमांस तो कळला तर तो फुटतो ). ( क्रि० होणें ; फुटणें ).
०कर्म   कर्में - न . अव . १ ब्राह्मणांचीं , अध्ययन ; अध्यापन , यजन , याजन , दान , प्रतिग्रह हीं कर्में . २ जारण , मारण , उच्चाटन , मोहन , स्तंभन , विध्वंसन हीं मंत्र व तंत्र विद्येंतील कर्में . ३ ब्राह्मणाच्या उपजीविकेंचीं सहा साधनें - कणवृत्ति , प्रतिग्रह , याचना किंवा भिक्षावृत्ति , कृषि , वाणिज्यवृत्ति , गोरक्ष , वार्धुषिकवृत्ति ( सावकारी ). ४ ( हटयोग ) धौती , कपालभाति , त्राटक , नेति , बस्ति , नौली .
०कर्मी वि.  षट्‍कर्में करणारा .
०कोण  पु. १ सहा कोनी आकृति . २ इंद्राचें वज्र . - वि . सहा कोनांचा .
०चक्र  पु. अव . ( हटयोग ) देहाच्या ठायीं असलेलीं सहा पद्माकार चक्रें - मूलाधार किंवा आधार , लिंग , नाभी , हृत् ‍ , कंठ , मूर्ध . यांना पद्में असेंहि म्हणतात . हीं देहाच्या मधील नाडीवर असतात . या नाडीस भागीरथी म्हणतात . तिच्या दोन्हीं बाजूंस दोन नाडया यमुना व सरस्वती या नांवाच्या आहेत . या चक्रांना आणखीहि इतर नांवें आहेत तीं - कूर्म , अनंतशेष , आधार , अनाहत , अधिष्ठान , नाभी , जठराग्नि , मणिपूर किंवा पद्म , मानस , कर्पूर ( याचे शेवटास ब्रह्मरंध्र असतें ), गरुड , गोल्हाट , त्रिगांति इ० ( क्रि० भेद करणें ).
०दर्शनें  न. अव . सौर , शाक्त , गाणपत्त्य , शैव , वैष्णव , स्कांद ; किंवा सांख्य , योग , न्याय , वैशेषिक , मीमांसा व वेदांत .
०पद   पदी - पुस्त्री . १ भ्रमर , भुंगा . २ ऊ . ३ ( ल . ) घोडेस्वार ( घोडयाचे चार व स्वाराचे दोन मिळून सहा पाय म्हणून ). - वि . सहा पायांचा ( ऊ , टोळ , भुंगा इ० ). - स्त्री . सहा चरणांचें कडवें असलेली कविता .
०प्रमाण  न. जीव आणि अंतःकरणपंचक मिळून सहांचें प्रमाण .
०प्रज्ञ वि.  गुण , संपत्ति , सुख , ब्रह्मानंद , जगाची प्रकृति , ब्रह्मज्ञान जाणणारा . अर्थ , पुरुषार्थ पहा .
०बाहु वि.  सहा हातांचा , षड्‍भुज .
०शास्त्रें  न. अव . १ ( षडंगें ) छंद , निरुक्त , व्याकरण , ज्योतिष , शिक्षा , कल्पसूत्र . २ दोन न्याय , वैशेषिक , मीमांसा , वेदांत , सांख्य , पातंजल योग .
०शास्त्रसंपन्न   शास्त्री - वि . १ वरील सहा शास्त्रें जाणणारा . २ ( ल . ) विद्वान , पंडित . ( पुढील सामाशब्द षड् ‍ या पदास जोडून आहेत ).
०अंग   षडंग - न . १ दोन हात , दोन पाय , कमर , डोकें हीं शरीराचीं अंगें . २ वेदांचीं व्याकरण , छंद , ज्योतिष , निरुक्त , कल्पसूत्र , शिक्षा हीं उपांगें . ३ - वि . सहा अवयवांचा , अंगभूत वस्तूंचा .
०अंग   न्यास - पु . हृदय , शिर , शेंडी , शरीर , नेत्र , यांना स्पर्श करून टाळी वाजविणें ( पूजा , जप , मंत्रसिध्दि ) इ० प्रसंगीं म्हणतांना .
०गुण  पु. अव . संपूर्ण ऐश्वर्य , धर्म , यश , श्री , ज्ञान , वैराग्य हे किंवा धर्म , वीर्य , कीर्ति , द्रव्य , दान , वैराग्य , हे ईश्वराचे संपूर्ण गुण , या गुणांनीं संपन्न तो . षड्‍गुणैश्वर्य संपन्न - पु . ईश्वर , देव . - वि . १ संधि , विग्रह , यान , आसन , द्वैधीभाव , समाश्रय ही राजनीतीचीं मुख्य अंगें असलेला . २ कोणत्याहि सहा गुणांचा किंवा तत्त्वांचा समुदाय असलेला .
०अंगुल   अंगुली अंगुळी - वि . सहा बोटांचा .
०ग्रही  स्त्री. एका राशींत सहा ग्रहांची युति .
०अब्द  न. सहा दिवसांचें प्रायश्चित .
०अक्षर  न. कांहीं येत नाहीं . एखाद्या मूर्खास थट्टेनें योजावयाचा शब्द .
०अक्षरीमंत्र  न. १ सहा अक्षरांचा कोणताहि मंत्र . २ मूर्ख , शंख , अज्ञानी .
०आनन  पु. १ कार्तीकस्वामी . २ - वि . सहा बाजूंचा .
०ऊर्मि  स्त्री. अव . शोक , मोह , क्षुधा , तृषा , जन्म , मरण .
०ज  पु. ( संगीत . ) सात स्वरांपैकीं पहिला स्वर ; गाण्याचे प्रारंभीं , गायक आपल्यास योग्य असा जो ध्वनि मापून घेतो तो . यास ३६ इंच लांबीच्या तारेचा ध्वनि व २४० आंदोलनें पाश्चात्य शास्त्रकारांनीं धरिलीं आहेत . [ सं . षट् ‍ + ज ]
०ज  पु. ( संगीत ) आठ शुध्द स्वरांचा समुदाय .
ग्राम  पु. ( संगीत ) आठ शुध्द स्वरांचा समुदाय .
०दर्शनें  न. अव . षट्‍दर्शनें पहा .
०भांतर  न. सूर्यचंद्राचें अवरोधन ; दोहोंमध्यें पृथ्वी येणें .
०भाव   विकार रिपु वैरी अरि वर्ग - पु . अव . काम , क्रोध , लोभ , मोह , मद , मत्सर हे मनुष्याच्या मनाचे शत्रु समजले गेलेले सहा विकार .
०भाव  पु. अव . जायते ( अन्म ), अस्ति ( अस्तित्व ), वर्धते ( वाढ ), विपरिणमते ( प्रौढ होणें ), अपक्षीयते ( क्षीणता ), नश्यति ( मृत्यु ) हे शरीराचे विकार .
०भुज  पु. १ षट्‍कोण . २ - वि . सहा हातांचा किंवा बाजूंचा .
०रस   षड्रस - पु . १ कटु , अम्ल , मधुर , लवण , तिक्त , कषाय हे अन्नाचे रस . २ - वि . स्वादिष्ट , रुचकर ( अन्न ); असल्या अन्नाच्या मेजवानीस षड्‍सभोजन म्हणतात .
०षड्रिपु   वरील षड्‍भाव पहा .
०वर्ग  पु. १ षड्‍भाव पहा . २ - वि . सहा वस्तूंचा समूह .
०शास्त्री   शास्त्रें - पु . न . षट्‍शास्त्री पहा . षडस्त्र - न . १ षट्‍कोण . २ - वि . सहा कोनांचा . षड्‍ऋतु - पु . अव . वसंत , ग्रीष्म , वर्षा , शरत् ‍ , हेंमंत , शिशिर . षडैश्वर्य - न . षड्‍गुणैश्वर्य पहा . ( पुढील शब्द षण् ‍ शीं योजलेले आहेत ).
०मास  पु. सहा महिन्यांचा काल . सहामाही .
०मास्य वि.  सहा महिन्यासंबंधीं .
०मुख  पु. षडानन पहा .
०मुखी   मुद्रा - स्त्री . ( हटयोग ) कानांचीं २ भोंकें , २ डोळे , ३ नाकपुडया या हातांच्या बोटांनीं दाबून करावयाची एक मुद्रा . ( यापुढील शब्द षष् ‍ शीं योजलेले आहेत ). षष्ठ - वि . सहावें . षष्टी षष्ठी - स्त्री . १ पंधरवडयांतील सहावी तीथ . २ सहावी विभक्ति . ३ दुर्गादेवी , सटवी . ४ ( ल . ) फजीती . - वि . ५ साठ .
०पष्ठीपूजन  न. प्रसूतीच्या सहाव्या दिवशीं दुर्गा व इतर देवता यांची करावयाची पूजा . षाडव , राग - पु . ज्यास सहा स्वर लागतात व एक वर्ज्य असतो असा राग . षाडव , औडुव - पु . ज्याच्या आरोहांत सहा स्वर व अवरोहांत पांच स्वर लागतात तो राग . षाडवतान - स्त्री . सहा स्वरांची तान . षाडव - षाडव - पु . ज्याच्या आरोहांत सहा व अवरोहांत सहा स्वर असतात असा राग . षाडव , संपूर्ण - पु . ज्याच्या आरोहांत सहा व अवरोहांत सात स्वर असतात तो राग .

षट् ‍     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
षट्   aषड् (in comp. for षष्) See below.
षट्  n. bind. six times, [ŚBr.]
षट्   c in comp. for षष्.

षट् ‍     

Shabda-Sagara | Sanskrit  English
षट्   r. 1st cl. (षटति) To be a part or portion.

षट् ‍     

adjective  पञ्चाधिकम् एकम् अभिधेया।   Ex. चित्रपतङ्गस्य षट् पादानि सन्ति।
MODIFIES NOUN:
क्रिया दशा तत्वम्
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmছয়
bdदʼ
guj
kasشَےٚ
kok
nep
telఆరవ
urdچھ , 6

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP