श्री रामाचे पद - तो मज भेटवा भेटवा । आत्मा...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
तो मज भेटवा भेटवा । आत्मा रघुवीर दावा ॥ध्रु.॥
अहिल्या उद्धरिली उद्धरिली । दिव्य बाळा केली ॥१॥
रीसवानरें पाळिलीं । निज पदीं वैसविलीं ॥२॥
धर्म स्थापिली स्थापिला । दुष्ट संहारिला ॥३॥
शंभू शूळपाणी शूळपाणी । अखंड ध्यातो मनीं ॥४॥
गणिका तारिली तारिली । विमानीं वाईली ॥५॥
दीनबंधू तो बंधू तो । सज्जनमेळीं वसतो ॥६॥
करुणा भाकितो मानसीं । कल्याण साधुसी ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : March 22, 2014
TOP