श्री रामाचे पद - हरिवर गिरिवर जळनिधि तरले ...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
हरिवर गिरिवर जळनिधि तरले । जड मूढ पावन जाले ।
रजनीचरवर शरणांगत तो । आक्षै बिभीषण नामा ॥१॥
कविवर वदला रे वदला राघवमहिमा ॥ध्रु.॥
रावण शिवगण शिववरदानें । अकगणित न गनी कोणा ।
अभंग ठाणें अमोघ बाणें । छेदुनि निर्मुळ नि:सीमा ॥२॥
हरिगण ऋषिगन सुरगण गणपति । पशुपति रघुपति भेटी ।
देव दुंदुभी गर्जती गजरें । जय जय श्रीरामा ॥३॥
जयजयकारी६ पुष्पक भारी । झळकतसे नभमंडळीं ।
फडकतसे जयवंत निशाण । कैकैसुतवरक्षेमा ॥४॥
सुंदर माता सुंदर भ्राता । सुंदर सीता कांता ।
सुंदर पट्टाधीशा सुमनें । पुजिती विश्रमधामा ॥५॥
मंळ जन नीवासी जन हें । सकळीक मंगळकारी९ ।
मंगळ भगिनीवर हा रघुवीर । कल्याणदायक प्रेमा ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : March 22, 2014
TOP