श्री कल्याणचे पद - टाळी टाळी हा काळ काळें टा...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
टाळी टाळी हा काळ काळें टाळी ।
टाळी टाळी हें जन्मदु:ख टाळी ॥धृ०॥
भागवतीं बोलिला वनमाळी । कथेमध्यें जो वाजवी टाळी ।
त्याची वंदितो चरणधुळी । माथा वोढवी श्री चंद्रमौळी ॥१॥
भक्तिभावा तुकला महाराजा । तुळसीदळ वंदी यदुराजा ।
वामनें सेविला बळिराजा । भीमातीरी नांदतो स्वामी माझा ॥२॥
कथेमध्यें मी तिष्टत आहे । ब्रह्मसुतेसी बोल बोलताहे ।
प्रेमटाळीसी नाम गर्जताहे । सर्व कल्याण त्यास चिंतिताहे ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 23, 2014
TOP