श्री गुरूचे पद - साधू रे धन्य साधू रे ॥ध्र...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
साधू रे धन्य साधू रे ॥ध्रु.॥
सकळ चराचर त्रिवीध देवा । समान अंतरीं वेदू रे ॥१॥
षड्रिपूचा संव्हार करूनी । दासासी केला बोधू रे ॥२॥
पंचभूतादि त्रिगुण माया । समूळ शोधिला शोधू रे ॥३॥
अहं सोहं हें गिळोनि ठेला । विवेक परमानंदू रे ॥४॥
षड्गुणईश्वर तो स्वामी माझा । कल्याण कृपासिंधू रे ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : March 23, 2014
TOP