मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
जे अक्रोध महानुभाव । योग ...

श्री गुरूचे पद - जे अक्रोध महानुभाव । योग ...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


जे अक्रोध महानुभाव । योग वैराग्य छत्रपतीराव ।
ज्यांच्या मतें हा बद्ध मोक्ष वाव । ज्यासी श्रुति म्हणती गुरुराव ॥१॥
रे सखया सज्जन दुर्लभ रे । ज्यासी बोलिजे सिद्ध स्वयंभ ।
जे भाविकासी अतिसुलभ । ज्याच्या दर्शनें अपार पुण्यलाभ ॥ध्रु.॥
भक्ति विलसती इंद्रियानंदें । शांतिक्षमेसी सुटली दोंदे ।
भूतकृपा सर्वत्र सम नांदे । जन संतुष्ट कीर्तिमकरंदें ॥२॥
दृश्य पदार्थ निर्लेभ ज्यासी । जे दानशूर निज वस्तूसी ।
थापें मारिले भये शोकासी । कृपा कल्याण दीन जनासी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP