मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
नारद वीणा वाहे गगनीं । घो...

श्री गुरूचे पद - नारद वीणा वाहे गगनीं । घो...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


नारद वीणा वाहे गगनीं । घोर मंद्र तार रुणझुणी ।
तंत ऐकां येती श्रवणीं । घन घमंड करितो मुनी ॥१॥
देवा३ तूं तूं तूं तूं  ॥धृ०॥
परा पश्यंती मध्यमा नादें । वैखरी ते नाचती५ छंदें ।
सोहं जप होतो ब्रह्मानंदें । ताळ तोडिला तत्त्वबोधें ॥२॥
देवाभक्तां जाली थोर भेटी । काय सांगों मी तेथींच्या गोष्टी ।
नामरुपाची करा तुम्ही लुटी । मग कल्याण कल्पकोटी रे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP