श्री कल्याण स्तवन - सद्गुरु दयाळ मोठा गे बाई...
रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
सद्गुरु दयाळ मोठा गे बाई ये ॥ध्रु०॥
सखी पुसे सखीयेसी । सद्गुरुची महिमा कैसी ।
गुह्य सांग मजपाशीं गे ॥१॥
सद्गुरुचे चरण धरी । भूत भूत वीवरी ।
चुकती चौर्यांसी फेरी गे ॥२॥
सखी म्हणे आवो बाई । शरण जा सद्गुरुपाईं ।
जन्ममृत्य मग नाहीं ॥३॥
मीपणाचा सोडी ताठा । सद्गुरु कृपाळू मोठा ।
बसवी सायोज्यापटा ॥४॥
कायावाचामनोभावे । सद्गुरूसी शरण जावें ।
पूर्वजासीं उद्धरावें ॥५॥
जना म्हणे सखीयेसी । विश्वासें कल्याण होसी ।
सद्गुरु तो पाप नाशी ॥६॥
N/A
Last Updated : March 26, 2014
TOP