मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
नित्यानित्यविवेकें अंतरीं...

श्री कल्याण स्तवन - नित्यानित्यविवेकें अंतरीं...

रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.

नित्यानित्यविवेकें अंतरीं जाला निर्विकारी । तो ब्रह्मचारी ॥ध्रु०॥
स्नानसंध्या जप हा अखंड करितो दशमद्वारीं ।
सद्‍गुरुवचनें भिक्षा दृढ विश्वासे स्वीकारी ।
येकीं येकपणाची निद्रा मीतूंपणेंविण सारी ॥१॥

मूळ अडबंदाचा कौपिन सहजीं सहज नेसे ।
सत्त्वशुद्धभस्मोद्धळणाचें अखंड ज्याला पिसें ।
त्यावरी अक्षमाळाभूषण सर्वांगीं ज्या विलसे ।
सत्यवचनलीनतेचें चिन्ह सबाह्य अंतरीं दिसे ॥२॥

सच्चिद्‍आनंदाचें यज्ञोपवीत राहे स्कंधीं ।
यमनियमप्रत्याहारें वासनांतर जो छेदी ।
कर्णी कुंडलदीप्ती झळकती आदिसिद्धांतादि ।
चहुं देहाच्या सुटल्या गांठी जीवशिवउद्वोधी ॥३॥

आठवनाठवातीत ज्याला बाणे स्थितिमुद्रा ।
अबोल बोले बोलत त्याची न कळे गति सुरइंद्रा ।
केसरिसद्रुरुसेवा करितां नेणे आळस निद्रा ।
शिवदिन ऐसा विरुळा निवडे मथनीं दैवसमुद्रा ॥४॥

N/A

Last Updated : March 26, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP