मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
तुझें तुजचिपाशीं आहे । डो...

श्री ब्रह्माचे पद - तुझें तुजचिपाशीं आहे । डो...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


तुझें तुजचिपाशीं आहे । डोळे उघडुनी तूं चि तूं पाहे ॥१॥
सर्वीं सर्वत्र दिसतें पाही । पाहातें पाहातें तें ग्रासूनी राही ॥धृ०॥
रक्त पीत ना श्र्वेत शाम । नील वर्ण ना वर्णीं आनाम ॥२॥
गुण निर्गुण रूपातीत । पूर्ण कल्याण सदोदीत ॥३॥
तेथें ( उरे) ना अस्तु काहीं । ( होणें जा )णें येणें नाहीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP