मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
श्री कृष्णाचे पद

श्री कृष्णाचे पद

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


दीनोद्धारा सुंदरा विश्ववंदना रे तूं ॥ध्रु.॥
गजइंद्रतारणा गणिकाउद्धरणा । अंबऋषिधृवपावना रे तूं ॥१॥
गोकुळपाळा भक्तकृपाळा । गोपाळा नंदनंदना रे तूं ॥२॥
कौरवकुळस्वकुळसंव्हारणा । पांडवजनप्रतिपाळणा रे तूं ॥३॥
वाल्मिक व्यास कविवर वर्णिती । गोवर्धनगिरिधारणा रे तूं ॥४॥
नाटक वेष विशेष३ मनोहर । कल्याण भक्तमोहना रे तूं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP