श्री गुरूचे पद - उपाधीं नस्तां जें आकाश । ...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
उपाधीं नस्तां जें आकाश । तें चि ब्रह्म निराभास ।
भास१ नाहीं तें आभास रे रे रे रे । पाहे गुरुकृपे सावकास रे ॥१॥
ब्रह्म निर्मळ निश्चळ । ब्रह्म अचळ अढळ ।
जेथें नाहीं मायामळ रे रे रे रे । निजरूप चि तें केवळ रे ॥२॥
तेथें उद्भव जाला कैसा । पाहा विचार आमासा ।
बुद्धियोगें होतो तमासा रे रे रे रे । पाहाणार विरे आप ऐसा रे ॥३॥
कासवीचें दूध काढीलें । वांझ पुत्रासी धाडियेलें ।
द्रव्य दर्पणींचें आणियेलें रे रे रे रे । मुनी श्राधासी वेचियेले रे ॥४॥
पाणीतळीं कबरी थोर । मृगजळीं हत्तीचे भार ।
भीष्मराया पर्णी सुंदर रे रे रे रे । राजकन्या ते चतुरे ॥५॥
आकाशाची साली काढिली । वाळवेची वेठी वळियेली ।
वारयाची वाति लविली रे रे रे रे । चंद्रकांतास उजळिले रे ॥६॥
माया पहातां पहातां ऐसी । सत्संगाची महिमा कैसी ।
दास कल्याण गुरुकृपेसी रे रे रे रे । भेटी जाली स्वरूपेसी रे ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : March 23, 2014
TOP