मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
अपराधाच्या कोटी । हे चि म...

श्री कल्याणचे पद - अपराधाच्या कोटी । हे चि म...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


अपराधाच्या कोटी । हे चि माझी कोटी ।
फेरे फीरलों जन्म कोटी । नीच अविवेकी हिण कोटी ॥१॥
शरण आलों श्रीगुरुराया । हा भवजळनिधि उतराया ।
दावी आपुल्या पाया । हे काया निववावया ॥ध्रु.॥
विधिहर सुरवर ध्याती । नारद तुंबद गाती ।
संतवृंदें गर्जताती । धन्य सद्‍गुरुमूर्ती ॥२॥
न लगो द्रव्यदारा । मज न लगे हा पसारा ।
माईक लटिका सारा । घेऊ नेदी उपसारा ॥३॥
बोधमूर्ती अंगीकारी । दास कल्याण हा पुकारी ।
नाना परी मी विकारी । परी तुझा चि टेहलकारी ।\४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP