मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
ठेवोनियां मस्तकीं पद्महस्...

श्री कल्याण स्तवन - ठेवोनियां मस्तकीं पद्महस्...

रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.

ठेवोनियां मस्तकीं पद्महस्त । केलें पहा मानस पूर्ण स्वस्थ ।
दाऊन मातें निज मूर्ति रामा । कल्याण केलें म्हणे दास शामा ॥१॥

बोधोनियां मंगळ वाळ्य बोध । नेला लया माइक सर्व भेद ।
निर्नाम जालों असतां रिकामा । कल्याण केलें म्हणे दास शामा ॥२॥

जो पिंड ब्रह्मांड पदार्थ झाडा । सांगीतला सर्व सुखें निवाडा ।
डोळां मला दाउनि मोक्षधामा । कल्याण केलें म्हणे दास शामा ॥३॥

हत् पंकजीं देशिकपाय ध्यातां । जालो स्वयें मंगलरूप आतां ।
देऊनि माते निज मोक्षधामा । कल्याण केलें म्हणे दास शामा ॥४॥

N/A

Last Updated : March 26, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP