मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
नमन श्रीगुरु निज पायां । ...

श्री गुरूचे पद - नमन श्रीगुरु निज पायां । ...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


नमन श्रीगुरु निज पायां । साधक तारक उपाया ।
संकट दुर्घट अपाया । सोह्म हंसा खुण पाया ॥ध्रु.॥
पतीतपावन ब्रीद गाजे । श्रवणें निर्भय मन माझें ।
भाविक सात्विक सुख माजे । षड्‍रिपुमंदिर मग लाजे ॥१॥
कृपाअंजने लेउनियां । ब्रह्म परात्पर होउनियां ।
सज्जनपदरज सेउनिया । अष्टै काया निरसुनियां ॥२॥
अपार महिमा गुरुराया । बद्ध भवार्णव उतराया ।
कल्याण अनुभव विवराया । अनाथ हीन दीन उद्धराया ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP