श्री कल्याण स्तवन - जया दर्शनें सर्व ही भ्रां...
रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
जया दर्शनें सर्व ही भ्रांति नासे । नुरे दैन्यसाम्राज्य मी ब्रह्म भासे ।
स्फुरेना अहो कल्पना दृष्ट कर्मी । नमस्कार साष्टांग कल्याणस्वामी ॥१॥
पहा वाक्यमात्रें चि जन्मांतरींचा । महा संशयो नाशिला अंतरींचा ।
पुरें सौख्य दे जो दयेनें अनामी । नमस्कार साष्टांग कल्याणस्वामी ॥२॥
असंख्यात ज्या संग्रहीं पुण्य गांठी । असे तैं अकस्मात त्या होय भेटी ।
भवाब्धी तुटे नांदवी पूर्ण धामीं । नमस्कार साष्टांग कल्याणस्वामी ॥३॥
कसा छेद बुद्धीसि लागों चि नेदी । अवस्था हुनी अक्षयी बोध सांदी ।
देहेप्राक्तनालागी खंडूनि नेमी । नमस्कार साष्टांग कल्याणस्वामी ॥४॥
सुखें राजवी नाशुनी सर्व चिंता । दयाळू असा काय वर्णूं अचिंता ।
महा उद्भवी डोम जो पूर्ण नामीं । नमस्कार साष्टांग कल्याणस्वामी ॥५॥
बहू मत्तमत्तांतरीं दाटि जाली । परी या पदीं वृत्ति निवृत्ति ठेली ।
जगजीवनाचा प्रभु जो अनामी । नमस्कार साष्टांग कल्याणस्वामी ॥६*॥
N/A
Last Updated : March 26, 2014
TOP