मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
श्री गुरुराजया माझिया स्व...

श्री गुरूचे पद - श्री गुरुराजया माझिया स्व...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


श्री गुरुराजया माझिया स्वामी दीनबंधू ॥ध्रु.॥
लिंग देहे मोठे खोटे । वज्रघाजें न तुटे  फुटे ।
अवलिळा चरणस्पर्शें केला छेदू ॥१॥

भव वारी वारी स्मरणें । जडमूढालागी तरणें ।
जन्मासी येणें मरणें नाहीं खेदू ॥२॥

परतर वर कल्याण देवा । हीन दीन जन पावन देवा ।
सज्जन हदयांतर देवा तुझा वेदू ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP