श्री कल्याण स्तवन - रामदास सद्गुरु अविनाशी अ...
रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
रामदास सद्गुरु अविनाशी अवतरला पाही ।
निशिदिनीं त्यासी हदयीं चिंतुनि चरणीं ठेवी डोई ॥ध्रु०॥
नाशिवंत पसारा अवघा जाणुनि दूर केला ।
स्वस्वरुपाचा अनुभव घेउनि उन्मनिसी ठेला ॥१॥
चरणाश्रित निज समीप त्यासी पूर्ण कृपा करी ।
नामरूपांसी त्यजूनी भवभय अपहारी ॥२॥
लीनवृत्ति कल्य ण स्वरूपीं आपण ची प्रगटला ।
अंतर्बाह्य जगज्जिवनाचा प्रभू तो चि जाला ॥३॥
N/A
Last Updated : March 26, 2014
TOP