श्री गुरूचे पद - परतर परवर श्रीरामा । अगाध...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
परतर परवर श्रीरामा । अगाध महिमा गुरु गरिमा ।
श्रुतिपर पर तूं परब्रह्मा । भवहर हर तूं विश्रामा ॥ध्रु.॥
मोक्षापाणी मम वौंशा । श्रीगुरुस्वामी मुळपुरुषा ।
षड्गुणईश्वर सर्वेषा । भवहर हर तूं वरईशा ॥१॥
अमुची वोळी देवाची । पतीतपावन सर्वाची ।
वर वरदायक जीवनाची । प्रचीत पदवी शीवाची ॥२॥
कृष्णावेण्यातिरवासी । सज्जनपर्वतनीवासी ।
सुरवर वांछिति देवासी । कल्याणदायक सर्वांची ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 23, 2014
TOP