श्री रामाचे पद - शेष श्रमला श्रुति म्हणती ...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
शेष श्रमला श्रुति म्हणती नेति नेती । काय करूं मी स्तुती,
मानव मंदमती ॥१॥
धन्य सन्दुरु रामा, मज न कळे तुझा महिमा । सिमा च होती
निसिमा, पुराण पुरुषोत्तमा ॥२॥
ब्रह्मा विष्णू हर, त्याहुनि परात्पर । विश्रांतीची थार,
मायेविण माहेर ॥३॥
सद्भाविकाला फळला, थोर लाभ जाला । अनुभव हा सज्जनाला,
वाचे राम बोला ॥४॥
नाम ह्मणतां वाचे, पद लाभे स्वामीचें । धाम कल्याणाचें,
तपफळ जन्मांतरीचें ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 22, 2014
TOP