श्री कल्याण स्तवन - कृपाकरा ठेउनि मस्तकीं हो ...
रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
कृपाकरा ठेउनि मस्तकीं हो । धरूनि मातें निज हस्तकीं हो ।
केलें पहा मानस स्वस्थ कीं हो । दिल्हें मला सौख्य समस्त कीं हो ॥१॥
आलिंगना देउनि आजि मातें । पाहा दयाळें हरिले श्रमातें ।
नेऊनिया मंगल आश्रमातें । केलें सुखी दाउनि ऊगमातें ॥२॥
पीयूषदृष्टी मज न्यहाळिलें हो । धरूनि मातेम कुरवाळिलें हो ।
बोधामृता पाजुनि पाळिलें हो । मीतूंपणापासुनि गाळिलें हो ॥३॥
कृपाळू माझा गुरु बापमाये । ब्रह्मांड गेहीं सहसां न माये ।
जो मोक्षदाता सकळा समाये । तो आजि माझ्या हदयीं समाये ॥४॥
गुरूपदीं ठेउनि मानसा हो । स्वहीत त्याला तुम्ही तेम पुसा हो ।
छेदूनि टाका अरिवर्ग सा हो । कलाणठायां मग जा बसा हो ॥५॥
संसार हा रे अवघा पसारा । माईक जाणा ममता पसारा ।
शोधीत जावा भवआपसारा । मनास तेथें मग ऊपसारा ॥६॥
ज्या पादपद्मा चुरिते रमा रे । त्या पादपद्मीं सुमनें रमा रे ।
वारी त्रितापा हरितो श्रमा रे । शामा म्हणे त्या भज उत्तमा रे ॥७॥
N/A
Last Updated : March 26, 2014
TOP