मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
कल्याणध्यान नयनांबुजिं दा...

श्लोक स्वामीचे - कल्याणध्यान नयनांबुजिं दा...

रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.

कल्याणध्यान नयनांबुजिं दाटलें हो ।
मायामृगांबु जग सर्व हि आटलें हो ।
बाह्यांतरीं सम हरी दिसे सर्व ठाईं ।
साम्राज्यसौख विलसे गुरुराजपाईं ॥१॥

कल्यानस्वामि वंदा हरुन जनमदा तारितो बुद्धिमंदा ।
सेवी वैराग्यकंदा जपत मनिं सदा रामपादारविंदा ।
वारी संसारधंदा वदनिं गुण वदा मान्य जो संतवृंदा ।
नेणे कापटय निंदा श्रम हरि समुदा नेणवे भाग्यमंदा ॥१॥

स्वामीचे बहु शिष्यवर्ग जगतीं त्यांमाजिं साधू भला ।
नामें मुद्‍गल योगीरा बरवा सत्‍शिष्य नामाथिला ।
भाग्याचा वर पावला गुरुकृपा कल्याण पावे पदा ।
यालागी सुख सामराजपदवी भोगी सदा संपदा ॥१॥

N/A

Last Updated : March 26, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP