श्री गुरूचे पद - श्रीगुरुराजपदांबुजभजनीं ।...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
श्रीगुरुराजपदांबुजभजनीं । कायिक वाचिक मन११ दिनरजनी ॥१॥
पतीतपावन तो । मानवसज्जनजीवन तो ॥ध्रु.॥
ब्रह्म परात्पर श्रीगुरुमूर्ती । भावी निरंतर अंतरवृत्ती ॥२॥
दारासुतगृह श्रीगुरुचरणीं । कविवर वदले तैशीच करणी ॥३॥
कर्मउपासक श्रीगुरुवचनीं । भजनविधीपर वैभवरचनीं ॥४॥
श्रीगुरुवाक्य प्रमाण जयासी । वरद हरिहर कल्याण त्यासी ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : March 23, 2014
TOP